पाच मंत्र्यांनी गडबड केल्याने तिकिटे कापली : शरद पवार


वेब टीम : पुणे
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील मतदार संघातच सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यांना घरातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवता येत नाही ते काय राज्याचे संरक्षण करणार?

भाजपच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनी कारभारात गडबड केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांची तिकिटे कापली, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वरवंड येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

भाजप सरकारच्या काळात राज्यात शेतकरी कर्जबाजारी संख्येत वाढ झाली आहे व शेतमाल योग्य बाजारभाव मिळत नसल्याने १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात राष्ट्रवादी सत्तेवर आल्यानंतर सर्व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार, पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी सहा ते सात धरणे बांधली असल्याने दौंड तालुका जिल्ह्यात बागायती भाग म्हणून ओळख निर्माण करत आहे.

भीमा पाटसच्या कामगारांचे पगार, भीमा पाटसवरील कर्जाची देणी, इतरांपेक्षा ऊसाला कमी बाजारभाव देऊन शेतकर्‍यांच्या संसाराची होळी करून मतदान मागायला लाज वाटत नाही का ?

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुष्काळ व पूर परिस्थितीमध्ये जनतेची भेट घेण्यासाठी भाजप नेत्यांना वेळ नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सभा घेण्यासाठी वेळ मिळतो. हेडलाईन होण्यासाठी भाजप नेते पवार साहेबांवर टीका करत आहेत.

 तसेच पवार साहेबांनी काय केले असे प्रश्न भाजप नेते उपस्थित करत आहेत, ज्या व्यासपीठावरून भाजप नेते जनतेला विचारात आहेत त्याच व्यासपीठाकडे पाहून विचारा पवार साहेबांनी काय केले त्याचे उत्तर नक्की मिळेल.

तसेच भीमा पाटसला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शेतकर्‍यांना ऊसाचा बाजारभाव जाहीर केला होता, पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ऊसाला कमी बाजारभाव देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे, असे खासदार सुळे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post