शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि इतर १३ मंत्रीपदे ; शिवसेना मात्र १८ मंत्रीपदावर ठाम


वेब टीम : मुंबई
भाजप सेना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना अशी गट झाली असून आता भाजपने शिवसेनेला अनोखी ऑफर दिली आहे.

ती म्हणजे आता फिफ्टी फिफ्टी नाही तर १३-२६ असं गणित भाजपकडून शिवसेनेला सांगण्यात आले आहे.

यामध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. तर मुख्यमंत्रीपद आणि इतर २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, अशीही माहिती मिळते आहे.

त्यामुळे आता भाजपच्या या अनोख्या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय फॉर्मुला सांगणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष सुरु असून यामध्ये भाजपने आज नवा फॉर्मुला सांगितल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेला या निवडणुकीत ५६ जागा मिळाल्या असून शिवसेना मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा अशी मागणी केली होती. तसेच शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे फिफ्टी-फिफ्टी हा ठरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरु आहे.आता शिवसेना काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post