कोहलीने जिंकण्याची जिद्द पाकिस्तानकडून शिकली : शोएब अख्तर


वेब टीम : लाहोर
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ‘भारतीय कर्णधार विराट कोहली जिंकण्याची जिद्द पाकिस्तानकडून शिकला आहे’ असा भन्नाट दावा केला आहे.

‘पाकिस्तानने ९०च्या दशकात भारताला भारतातच पराभूत केले होते.

अगदी तसाच खेळ आणि तीच जिद्द आता विराटमध्ये दिसत आहे,’ असेही शोएब म्हणाला.

‘सध्या भारतीय संघ हा पाकिस्तानसारखा खेळत आहे तर पाकिस्तानच्या संघाची अवस्था काही वर्षांपूर्वीच्या भारतीय संघासारखी झाली आहे.

पाकिस्तानची अशी अवस्था होणे हे अत्यंत विदारक आहे. आम्हाला भित्रे क्रिकेटपटू नको तर मैदानावर सत्ता गाजवणारे निर्भिड खेळाडू हवे आहेत,’ असे मत त्याने व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post