कराची-रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये स्फोट; ७५ जणांचा मृत्यू


वेब टीम : कराची
पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात कराची रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये अचानक लागलेल्या आगीत 75 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लियाकतपूर शहराजवळ हि घटना घडली आहे. रावळपिंडी जात असताना एक प्रवासी ट्रेनमध्येच गॅस स्टोव्हचा वापर करत होता.

त्याचवेळी अचानक स्फोट झाला आणि ट्रेनमध्ये भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती रहीम यार खान जिल्ह्याच्या आयुक्तांनी माहिती दिली.

जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा अजून वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जखमींना लियाकतपूर येथील डीएचक्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख राशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस टाकीच्या स्फोटाने दोन डब्यांना अचानक आग लागली.

त्यातही मृतांचा आकडा आग लागून होरपळल्याने नव्हे, तर धावत्या गाडीतून उडी मारल्याने झाला आहे.

आग लागताच अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. अनेकांचा मृत्यू यामुळेच झाल्याचे दिसून आले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की मृतांची अवस्था इतकी वाइट आहे, की त्यांची ओळख पटवणे सुद्धा अशक्य झाले आहे.

सोबतच, ज्या जखमींना रुग्णाल.यात उपचारासाठी नेण्यात आले, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

काहींना तर हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमींना मुल्तानला पाठवले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post