नगर शहरातील गुंडागर्दी मोडून काढणार : उद्धव ठाकरे यांचा इशारा

File photo

वेब टीम : अहमदनगर
नगर शहराच्या विकासासाठी अनिल भैया लवकरच जाहीरनामा देतील. मात्र मी सर्व नगरकरांना सांगू इच्छितो की, नगर शहरातील गुंडागर्दी मी मोडून- तोडून काढणार, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

शहरातील नंदांवन लोन येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, नगर शहरामध्ये कसले आले ते गुंड? कोण आहेत हे गुंड? आणि असल्या लोकांना तुम्ही शहराचा प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवणार. हीच नगरची ओळख बनवणार नाही ना.

ज्यांची जोड्या पाशी उभे राहण्याचीही लायकी नाही आणि ते नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत येणार. नगरचा लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे? गुंडा असला पाहिजे? ही नगरची ओळख बनू द्यायची.

अनिल भैया जिंकला हरला हा मुद्दा नाही. हा नगरकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. पण लक्षात असू दे यापुढे जर गुंडागर्दी केली तर मी बोलून नाही तर करुन दाखवेल अशा शब्दात ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला.

सभेमध्ये भाषणातून ठाकरे यांनी शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकरी पाणी मागत असताना यांनी ज्याप्रकारे उत्तरे दिली त्याचाच परिणाम म्हणून यांना सत्ते बाहेर राहावे लागत असल्याचे ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post