मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चा फिस्कटली : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
शिवसेना भाजपमध्ये आधी जागावाटपावरून रंगलेला वाद आता सत्तास्थापनेपर्यंत सुरूच आहे. निकालाला आठवडा उलटला असला तरी सत्तेसाठी रस्सीखेच सुरु आहे.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘५०-५० फॉर्म्युल्याबाबत सेनेला कोणतेही आश्वासन दिले नव्हते’ या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘५०-५० फॉर्म्युला नाकारण्याचे ते वक्तव्य फडणवीस यांनी करायला नको होते, त्यामुळेच सगळी चर्चा फिस्कटली. मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो शत्रुपक्ष मानत नाही.

आम्ही राज्यात स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करु. मात्र, कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आल्याचे समजू नये,’ असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. शिवसेना आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post