नगर जिल्ह्यात भाजप- शिवसेनाच पुढे; आघाडीला मिळणार केवळ 'या' दोनच जागा


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी धुमाकूळ घातला आहे.

नव्याने आलेल्या एका सर्वेक्षणात जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला केवळ दोनच जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हा सर्व्हे व्हायरल होत आहे. त्यानुसार संगमनेर येथे बाळासाहेब थोरात व नेवासेतून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख अशा दोनच जागा विरोधकांना मिळू शकतात, असा अंदाज देण्यात आला आहे.

कर्जत- जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात उभे असलेल्या रोहित पवार यांचाही पराभव निश्चित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

mr.dnalive24.com

नगर शहरातून संग्राम जगताप, शेवगाव- पाथर्डी मधून प्रताप ढाकणे, अकोल्यातून किरण लहमटे, श्रीरामपुरातून लहू कानडे, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, श्रीगोंदयातून घनश्याम शेलार, पारनेरमधून निलेश लंके, कोपरगावातून आशुतोष काळे यांना निवडणूक अवघड जाणार असून, भाजप- शिवसेनेच्या उमेदवारांना याठिकाणी यश मिळणार सल्याचा दावा करण्यात आला आहे.

या सर्व्हेमुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post