वेब टीम : अहमदनगर विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होत असून जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 यावेळेत 5.64 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान पावसाच...
वेब टीम : अहमदनगर
विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होत असून जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 यावेळेत 5.64 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान पावसाच्या सावटामुळे काही ठिकाणी मतदार उशिरा घराबाहेर पडत आहेत.
सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर येणार्यांचा ओघ खूपच कमी होता. या तीन तासांत जिल्ह्यातील मतदार केंद्रावर अवघे 5.64 टक्केच मतदान झाले आहे.
जिल्ह्यात विधानसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले असून विविध ठिकाणी मतदारांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात सकाळी 11 यावेळेत 18 टक्के मतदान झाले आहे.
नेवासा मध्ये सर्वाधिक 7 टक्के मतदान झाले असून ,तर श्रीगोंद्यामध्ये सर्वांत कमी 3 टक्के मतदान झाले आहेत.
COMMENTS