वेब टीम : बीड ‘परळीमध्ये मायबाप जनतेने न्याय दिला.त्या न्यायाचा अर्थ माध्यमांनी काढावा,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व परळी विधानसभ...
‘परळीमध्ये मायबाप जनतेने न्याय दिला.त्या न्यायाचा अर्थ माध्यमांनी काढावा,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
परळीमध्ये धनंजय मुंडे यांची लढत त्यांची चुलत बहीण व राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झाली.
भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वत: पंकजा यांच्या प्रचारासाठी जंगी सभा घेतल्या होत्या.
अखेरच्या टप्प्यात हा प्रचार प्रचंड गाजला होता. ‘परळीच्या जनतेने ठरवलंय’ अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी दिली होती.
COMMENTS