शिवसेनेचं संख्याबळ वाढलं; आमदार शंकरराव गडाखांचा शिवसेनेला पाठिंबा


वेब टीम : मुंबई
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी शंकराव यांचे बंधू प्रशांत गडाख, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

सोमवारी सकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे खाजगी विमानाने शिर्डी येथे उतरून सोनई येथील आमदार गडाख यांच्या निवसस्थानी जाऊन भेट दिली. जेष्ट नेते यशवंतराव गडाख व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोनवर संभाषण झाल्यावर सेनेचे सचिव मिलींद नार्वेकर हे आमदार शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना पाठिंब्याचे पत्र सोबत घेत विमानाने मुंबई येथे मातोश्रीवर घेऊन गेले.

शंकरराव गडाख यांनी अपक्ष विजय मिळवत आपली ताकत दाखवून दिली आहे . गेल्या 3 दिवसात गडाख यांना भाजप , सेना ,राष्ट्रवादी यांच्याकडून गळ घातली जात होती . मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांनाही गडाख यांना मुंबईत भेटीसाठी बोलाविले होते. त्याप्रमाणे आमदार शंकरराव गडाख मुंबईला जाऊन आले. परंतु त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती.

https://mr.dnalive24.com/2019/10/shankarrao-gadakh-shivsena.html

नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे अपक्ष उमेदवार शंकराव गडाख हे निवडून आले.  त्यापार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आल्यानंतर कुटुंबीयांसोबत काढलेला फोटो तसेच आमदार शंकराव गडाख यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे काढलेले जुने फोटो व्हायरल केले आहेत. त्यामुळे गडाख हे शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


शिवसेनेत प्रवेश करताना मंत्रिपद मिळावे यासाठीही गडाखांनी फिल्डिंग लावली आहे. त्यानुसार लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गडाखांचा प्रवेश होऊ शकतो. गडाखांना मंत्रिपद देऊन जिल्ह्यात शिवसेनेला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होऊ शकतो. अधिकृतरीत्या गडाख कधी शिवसेनेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post