अहमदनगर - सोलापूर रस्त्याचे होणार चौपदरीकरण


वेब टीम : अहमदनगर
नगर-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मार्गावरील नगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी रस्त्यालगतच्या गावांतील आवश्यक जमीन संपादित करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून संपादित जागा लवकरच सर्व प्रकारचे बोजे, अधिकारांपासून मुक्त होवून केंद्र सरकारकडे जमा होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी (दि.29) याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या नव्या वर्षात चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लागणार आहे.

नगर शहरातून पुणे, कल्याण, औरंगाबाद, मनमाड, पाथर्डी, सोलापूर व बारामती हे प्रमुख सात महामार्ग जातात. हे सर्व महामार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्यात आलेले आहेत.

राज्य सरकारकडून हे रस्ते केंद्राकडे वर्ग करून त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कल्याण-विशाखापट्ट्णम या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत नगर जिल्ह्यातील काम सध्या सुरू आहे.

तसेच नगर करमाळा-टेंभुर्णी या राष्ट्रीय राजमार्ग 516-ए मधील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नगर-करमाळा-टेंभुर्णी या सध्या सिंगल रोड असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post