वैतागलेल्या नगरकरांनी रस्त्यांवरील खड्डयात लावले दिवे


वेब टीम : अहमदनगर
शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे वैतागलेल्या नगरकरांनी शुक्रवारी सायंकाळी खड्डयात दिवे लावून प्रशासनाला जाग आनण्याचे प्रयत्न केले. दिल्लीगेट येथे गांधीगिरी करीत हे आंदोलन नगर शहर बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आले.

या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होऊन लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात हरजितसिंह वधवा, हरिभाऊ डोळसे, विपुल शहा, सुनील छाजेड, संध्या मेढे, राजेश सटाणकर, भरत बागरेचा, भैरवनाथ खंडागळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

नगर शहरातून जाणारे मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले. खड्डयात पाण्याचे डबले साचून लहान-मोठे अपघात होऊन आरोग्याचा प्रश्‍न देखील उद्भवला आहे. जीव मुठीत धरुन नागरिकांना या खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांमधून वारंवार मागणी होत आहे.

या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखेर नगर शहर बचाव कृती समितीच्यावतीने खड्डे प्रकाशमान करुन हे आंदोलन करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post