वेब टीम : मुंबई राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी भाजपच्या गोटात जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यातल्या सत्तानाट्याला वे...
वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी भाजपच्या गोटात जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यातल्या सत्तानाट्याला वेगळेच वळण मिळाले.अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना राजीनामा देण्याची विनंती केली होती.
त्यानंतर आता अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत अजित दादांनी स्वगृही परतावे अशी भावनिक साद घातली आहे.
काय म्हणाले रोहीत पवार...
लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.
अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.
आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,
पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.
लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.
COMMENTS