निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत 'हायअलर्ट'; हल्ल्याची शक्यता


वेब टीम : अयोध्या
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये शिरल्याची माहिती गुप्तचर संस्थांकडून येत आहे.

अयोध्येत हल्ला घडवण्याच्या उद्देश्याने आल्याची माहिती मिळते, या नंतर गुप्तचर संस्थांकडून अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानातील एका दहशतादी गटाकडून भारतात घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुप्तचरसंस्थाना मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमार्गे सात दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये शिरले. या संदर्भातील माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली.

हे सातही दहशतवादी पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी गटाचे सदस्य आहेत. हे दहशतवादी अयोध्येसह फैजाबाद आणि गोरखपूर या ठिकाणी दडल्याची शक्यता वर्तवली आहे.

या सात दहशतवाद्यांपैकी पाच जणांची ओळख पटली असून, मोहम्मद याकूब, अबू हमजा, मोहम्मद शहाबाज, निसार अहमद आणि मोहम्मद कौमी चौधरी अशी त्यांची नावे आहेत.

अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येणार आहे,या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था जास्त सावध आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post