भाजप - राष्ट्रवादीची युती राज्याला स्थिर सरकार देईल : अजित पवार


वेब टीम : मुंबई
भाजपच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी दोन ट्विट करत सत्तानाट्याला वेगळे वळण दिले आहे.

पवार यांनी ‘मी अजूनही राष्ट्र्वादीतच आहे आणि राष्ट्र्वादीतच राहिल. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत.

राष्ट्रवादी आणि भाजपची युती राज्याला पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देईल आणि लोककल्याणासाठी काम करेल’ असा दावा केला आहे.

तसंच, काळजी करण्यासारखे काही नाही, सगळं काही ठीक आहे. फक्त थोडा संयम ठेवा. अशा आशयाचं ट्विटही केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post