पुण्यात रेल्वे पार्किंगमागे सापडले हॅन्डग्रेनेड


वेब टीम : पुणे
ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर गुरुवारी दुपारी हॅन्डग्रेनेड सापडले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ते निकामी केले.

नष्ट केलेल्या ग्रेनेडचे तुकडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले असून लष्करालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

ताडीवाला रस्त्यावर रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. त्याच्या शेजारीच फलाटावर जाण्यासाठी पादचारी उड्डाणपुल आहे. या पुलाशेजारील पार्किंगच्यामागे रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला हॅन्डग्रेनेड सदुश्य वस्तू आढळली.

त्याने तातडीने रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय संतोष बडे आणि कॉन्स्टेबल विकास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथक आणि नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

बंडगार्डन पोलीसांचे पथक आणी बीडीडीएस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सील करुन पहाणी केली असता,हॅन्डग्रेनेड आढळले.

रेल्वे मैदानावर नेऊन स्फोट घडवून ग्रेनेड नष्ट करण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, सहायक आयुक्त आरपीएफ सी एस चेंगप्प, निरीक्षक आरपीएफ सुहास कांबळे आणि उप निरीक्षक अजित कोल्हे व बापूसाहेब कायगुडे दाखल झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post