येणारे सरकार पाच काय पंधरा वर्षेही टिकेल : पाटील


वेब टीम : मुंबई
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आला आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दीर्घ बैठक पार पडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाले असून मित्रपक्ष व शिवसेनेशी चर्चा केली जाईल अशी माहिती दिली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘येणारे सरकार संपूर्ण पाच वर्ष टिकावं यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे.

जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने ठरेल. भक्कम पायावर उभं राहिलं, तर हे सरकार पाच काय पंधरा वर्ष टिकेल,’ असा दावा केला.

सरकारस्थापनेबाबत चर्चा बरीच पुढे गेली असून आमच्या मित्रपक्षांना आम्ही शुक्रवारी १२ वाजता मुंबईत भेटणार आहोत. त्यानंतरच पुढची आवश्यक पावले तातडीने पडतील असं मला वाटतं.

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही शिवसेने बरोबर सरकार स्थापनेसाठी चर्चा करणार असून त्यानंतर पुढे जाणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

शिवसेना हा नवा पक्ष आमच्याबरोबर जोडला जातो आहे. त्यामुळे समन्वयाची आवश्यकता आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post