नवं सरकार आज बहुमत सिद्ध करणार


वेब टीम : मुंबई
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्र्यांचा शपथविधीही उत्साहात पार पडला.

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरची मुदत दिली असली तरी शनिवारीच नवं सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे.

‘बहुमत चाचणीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाविकास आघाडीला १६२ आमदारांचा पाठिंबा होता, आता हा आकडा १७० वर पोहोचला आहे.

तिन्ही पक्ष मिळून पाच वर्षे उत्तम कामगिरी करू,’ असा विश्वास शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.


विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड केली होती. त्यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली.

बहुमत चाचणीपूर्वी हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता असल्याने वळसे पाटलांची नियुक्ती पुढील कार्यकाळासाठीही निश्चित मानली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post