शिवसेनेने तयारी करावी, राज्याला योग्य सरकार देऊ : राष्ट्रवादी


वेब टीम : मुंबई
शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून आद्यपही रस्सीखेच सुरूच आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचं दिसत आहे.

शिवसेनेची तयारी असल्यास राज्याला योग्य असे पर्यायी सरकार देऊ, असा अप्रत्यक्ष प्रस्ताव राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेनेला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळवता आले नाही. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरीही पुरेसे संख्याबळ नसल्यानं त्यांनी अद्यापही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही.

अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सांकेतिक भाषेचा वापर करताना तशी वेळ येणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नमूद केलं.

शिवसेनेनं तयारी दाखवल्यास आणि त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितल्यास आम्ही पुढाकार घेऊ. त्यामुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल, असंदेखील मलिक यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post