प्रज्ञा ठाकुरची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून हकालपट्टी


वेब टीम : दिल्ली
लोकसभेत नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलाच महागात पडला आहे.

विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे.

वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

भाजपचे संसदेमधील कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रज्ञा यांचे वक्तव्य दुर्देवी असून संसदेचा कार्यकाळा दरम्यान असे वक्तव्य करणे निंदनिय आहे असे मत नोंदवले.

तसेच प्रज्ञा यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधूनही काढणार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला प्रज्ञा यांना उपस्थित राहता येणार नाही.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत.

विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post