राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ


वेब टीम : अहमदनगर
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.

रोज सायंकाळी 7 वाजता नगर केंद्रावर 18 नाटके सादर होणार असून, नगरकरांना एकापेक्षा एक सरस नाटकांची मेजवानी मिळणार आहे.

15 नोव्हेंबर रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे पांडुरंग घांग्रेकर दिग्दर्शित ’मरी जाय झो’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.

16 नोव्हेंबरला श्रीरामपूरच्या स्माईल फाउंडेशनचे संदीप कदम दिग्दर्शित वादळवेणा, 18 नोव्हेंबरला सप्तरंग थिएटर्सचे शाम शिंदे दिग्दर्शित मलिका, 19 नोव्हेंबरला समर्थ प्रतिष्ठानचे संदीप येळवंडे दिग्दर्शित रात संपता संपेना, 20 नोव्हेंबरला रंगोदय प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम उपाध्ये दिग्दर्शित घुसमट, 21 नोव्हेंबरला संगमनेर रंगकर्मीचे अंतून घोडके दिग्दर्शित शेवंता जित्ती हाय, 22 नोव्हेंबरला नगरच्या रंगकर्मी प्रतिष्ठानचे शैलेश देशमुख दिग्दर्शित एक होता बांबुकाका, 23 नोव्हेंबरला नटेश्वर मंडळाचे राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित अरे देवा, 24 नोव्हेंबरला कस्तुरबा प्रतिष्ठानच्या पल्लवी पटवर्धन दिग्दर्शित अमन या शांती, 25 नोव्हेंबरला कर्णेज अकॅडमीचे रातमतरा, 26 नोव्हेंबरला कला साई नाट्य संस्था कोपरगावचे अजूनही चांदरात आहे.

27 नोव्हेंबरला जिप्सी प्रतिष्ठान अहमदनगरचे शशिकांत नजान दिग्दर्शित मिडल स्टिक, 28 नोव्हेंबरला जय बजरंग मंडळाचे संजय लोळगे दिग्दर्शित उत्तरायण, 29 नोव्हेंबरला एकात्मता मंचचे अविनाश कराळे दिग्दर्शित शापित माणसांचे गुपित, 30 नोव्हेंबरला चौपाटी कारंजा मंडळाचे अमित खताळ दिग्दर्शित बाईपण, 2 डिसेंबरला भूमी प्रतिष्ठानचे कृष्णा पाचारणे दिग्दर्शित गाभण, 3 डिसेंबरला अपंग विकास संस्थेचे नवनाथ कर्डिले दिग्दर्शित जिहाद, 4 डिसेंबरला जिल्हा हौशी नाट्य संघाच्या उर्मिला लोटके दिग्दर्शित मोमोज हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post