संजय राऊत यांनी माझी भेट घेतली पण राजकारणाबाबत चर्चा झाली नाही


वेब टीम : नाशिक
संजय राऊत यांनी माझी भेट घेतली हे खरं आहे. पण राजकारणाबाबत चर्चा झाली नाही. काँग्रेसचे नेते दिल्लीत जाऊन वरिष्ठांना भेटले याबाबतही माहिती नाही.

त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही मला कल्पना नाही.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकाचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानग्रस्त भागाची शरद पवार यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

त्यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मुनगंटीवार यांना राष्ट्रपतींचे अधिकार दिले आहेत काय, याची माहिती नाही, असा चिमटा पवारांनी काढला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post