पीकविमा कंपनीत शिवसैनिकांचे खळ्ळखटॅक; कार्यालयात केला राडा


वेब टीम : पुणे
कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रस्त्यावर असलेल्या इफ्को-टोकयो या पीकविमा कंपनीचे कार्यालय बुधवारी दुपारी शिवसैनिकांनी फोडले.

राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना पीकविमा कंपन्या शेतकर्‍यांना विम्याच्या रकमा देत नसल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली.

 ही फक्त सुरूवात आहे, राज्यात चित्रपट दिसायचा बाकी आहे,अशा शब्दांत शिवसैनिकांनी पीकविमा कंपन्यांना इशारा दिला.

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असूनही त्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना योग्य वेळेत पीकविम्याच्या रकमा मिळाव्यात, या मागणीसाठी शिवसैनिकांनी बुधवारी दुपारी इफ्को टोकयो कंपनीचे कार्यालय फोडून आंदोलन केले.

राज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना हाती आलेले पीक पूर्णपणे गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येलादेखील सुरूवात झाली आहे.

पीकविमा न घेतलेल्या कंपन्यांनादेखील राज्य सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, पंचनामे आणि कागदी घोडे नाचवून सरकारही वेळकाढूपणा करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post