राज्यात थंडीचा पारा खालावला; अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी नोंद


वेब टीम : पुणे
उत्तर आणि ईशान्य भारतातून राज्यात मोठ्या प्रमाणात थंड वार्‍याचे प्रवाह दाखल होत आहेत. त्यातच राज्यातही कोरडे हवामान आहे.

त्यामुळे निम्म्या राज्यातील किमान तपमान 16 अंशांपेक्षाही खाली घसरले आहे.

त्यामुळे काही भाग कडाक्याच्या थंडीने गारठला आहे, तर काही भागात मोठ्या प्रमाणात धुके वाढले आहे.

राज्यात नगर येथे निचांकी 12.6 अंश किमान तपमानाची बुधवारी नोंद झाली.

उर्वरित भागातही दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post