अजित पवार- देवेंद्र फडणवीस यांची तासभर चर्चा; उद्या करणार 'हा' खुलासा


वेब टीम : मुंबई
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार मुंबईतील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. रविवारी दिवसभर अनेक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते निवासस्थानावर बाहेर पडले होते.

सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी) शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण सुणावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  बैठकीत झालेल्या चर्चेचा खरा खुलासा हा उद्याच होणार आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात संयुक्तरित्या याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. रविवारी न्यायालयाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post