भाजपला धक्का; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत


वेब टीम : जयपूर
राज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं असलं तरी शिवसेना मात्र मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय होऊ शकतो.

जयपूरमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी येत्या काही तासात शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला. सरकार स्थापनेत भाजप अपयशी झाल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना वाटाघाटीच्या करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज रात्री नऊ वाजता पुन्हा कॉंग्रेसची बैठक होणार आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे हे प्राधान्य हे काँग्रेसचे प्राधान्य असल्याचे समजते. जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. तर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्यांच्या विरोधात मतदान करु आणि ज्यावेळी सरकार कोसळेल त्यावेळी पर्यायी सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post