आरएसएसने आमच्याशी संपर्क साधला पण आता वेळ निघून गेलेली : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्क साधत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र आता जुळवून घेण्यासाठी वेळ निघून गेली असल्याचे ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना बैठकीत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप आणि शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने शेवटपर्यंत ते एकत्र आले नाहीत. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.

भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानेही उद्धव ठाकरेंशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पण आता खूप उशीर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार आपल्यासोबत ठाम उभे आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही आपण तिनही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत असेही ते म्हणाले.

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचात दररोज नवीन आणि नाट्यमय वळण मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले आमदार पक्षासोबतच राखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने खास बंदोबस्त केला असून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post