वेब टीम : अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक अनिल शिंदे व विनीत पाउलबुधे विजयी झाले आहेत. शिवसेने...
वेब टीम : अहमदनगर
जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक अनिल शिंदे व विनीत पाउलबुधे विजयी झाले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे नगरसेवकांमध्ये असलेली फूट या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड समर्थक दोन्ही उमेदवार पडल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
तीन जागांसाठीच्या या निवडणुकीतील एक जागा बिनविरोध झाली. भाजपच्या आशा कराळे यांना संधी मिळाली. उर्वरीत दोन्ही जागाही बिनविरोध होतील असे प्रयत्न सुरु होते. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर पाठवावा, असा मतप्रवाह नगरसेवकांमधून पुढे आला होता.
त्यात भाजपकडून कराळे व राष्ट्रवादीकडून पाउलबुधे यांची नावे निश्चित झाली. मात्र, शिवसेनेत उमेदवारीवरुनच संघर्ष उफाळून आला. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्याच अमोल येवले यांनी उमेदवारी केली.
तसेच सुवर्णा जाधव यांनाही पाउलबुधे यांच्या विरोधात उतरविण्यात आले. सेनेचे दोन उमेदवार समोरासमोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याचे चित्र होते.
निवडणूक निकालात अमोल येवले व सुवर्णा जाधव यांना केवळ १०-१५ मते मिळाल्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपनेही अनिल शिंदे यांना साथ देत शिवसेनेच्या राठोड गटाला धक्का दिला आहे.
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा निकाल
सर्वसाधारण प्रवर्ग
अनिल शिंदे : ५२ मते (शिवसेना)
अमोल येवले : १० मते (शिवसेना)
बाद मतदान : ५
नागरीकांचा मागास (OBC) प्रवर्ग
विनित पाऊलबुधे : ४८ मते (राष्ट्रवादी)
सुवर्णा जाधव : १५ मते (शिवसेना)
बाद मतदान : ४
COMMENTS