आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यास सक्षम : बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले


वेब टीम : दिल्ली
पाकिस्तानमध्ये श्रीलंकेचा दौरा यशस्वीपणे झाल्यानंतर भारतातल्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एहसान मानी यांना बीसीसीआयने सडेतोड उत्तर दिले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महिम वर्मा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मानी यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले.

”पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे हे आम्ही दाखवून दिले. सध्या तर भारतातच पाकिस्तानपेक्षा सुरक्षेच्या बाबतीत अधिक धोका आहे.

श्रीलंकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर तर पाकिस्तानातील सुरक्षेबाबत कुणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही,”असे मानी म्हणाले होते.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना वर्मा म्हणाले,”मानी यांना प्रथम स्वत:च्या देशाकडे पहावे.आमच्या देशाची सुरक्षा करण्यास आम्ही सक्षम आहोत.”

भारत आणि पाकिस्तान मधील राजकीय संबंध तणावाचे असल्याने त्याचे परिणाम क्रिकेटवर देखील झाले.

दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत.हे दोन्ही संघ फक्त आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेतच क्रिकेटचे सामने खेळतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post