मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने मला सोडावे : पंकजा मुंडे


वेब टीम : बीड
गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

पक्ष माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं थेट आव्हान भाजप नेतृत्वाला देत आपल्या राज्य दौर्‍याची घोषणा पंकजा यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.

या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते.

या मेळाव्याला मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनंतर पंकजा मुंडे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर अनेक चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या आजच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

मन मोकळं केलं नाही तर विष तयार होतं असं म्हणतं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

 पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केली.

२७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेतृत्व व पक्षातंर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. ’राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती’ ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला.

ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवणयासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वार्‍यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेतृत्व व पक्षातंर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.

’राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती’ ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला. ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवणयासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वार्‍यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. आम्हाला आमचा जुना पक्ष हवाय, असं सांगत पंकजा यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्न उभे केले.

माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही असे म्हणत पंकजा यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतूम मुक्त करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झाला होता. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न केले असल्याचे पंकजा यांनी सांगितले. तरीदेखील माझ्याविरोधात बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या चेहर्‍यावरील दु:ख पाहिले. पक्ष आणि घर फुटण्याची चिंता त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होती.

एक मुलगी म्हणून हे दु:ख मी समजून घेऊ शकते. घर फुटण्याचे दु:ख काय असतं हे मला ठाऊक असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post