नासा ने बनवले विजेवर चालणारे विमान


वेब टीम : टेक्सस
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ ने पूर्णपणे विजेवर चालणार्‍या आपले पहिले विमान ‘एक्स 57’ चे नुकतेच अनावरण केले.

गेल्या दोन दशकातील नासाचे असे पहिले असे ‘एक्स’ विमान आहे की, त्यामध्ये लोक आता प्रवास करु शकतील. या विमानाची चाचणी आता एक वर्षाने घेण्यात येणार असल्याचे समजते.

संपूर्णत: विजेवर चालणार्‍या या विमानाला इटलीच्या ‘टेकनाम पी 2006’ विमानासारखे तयार करण्यात आले आहे.

कॅलिफोर्नियास्थित ‘इम्पिरिकल सिस्टमएअरोस्पेस’ ने गेल्या दोन ऑक्टोबर रोजी पूर्णत: विजेवर चालणारे पहिले प्रायोगिक एक्स-57 नासाकडे सुपूर्द केले होते.

नासाने दिलेल्या माहितीनुसार ‘एक्स 57 प्रोजेक्ट’ मुळे भविष्यात विजेवर चालणार्‍या विमानांच्या निर्मितीस बळ मिळेल.

नासाचे हे ‘एक्स 57’ विमान अनेक बाबतीत अत्यंत खास आहे. या विमानात रिचार्ज होणारी लिथिअम 5 आयर्न बॅटरी बसविण्यात आली आहे.

याशिवाय हवेचा प्रवाह वाढवण्यासाठी विमानाच्या पंखांजवळ डझनभर मोटारीही बसविण्यात आल्या आहेत. ‘एक्स 57’ हे विजेवर चालणारेविमान विकसित करण्यासाठी सुमारे 20 वर्षे लागली आहेत.

एकावेळी चार लोकांना घेऊन उडाण करु शकणार्‍या या विमानात 14 इलेक्ट्रिक क्रूझर मोटर्सचा वापर करण्यात आला आहे.

उल्लेखनीय म्हणजे भविष्यात या विमानांचा वापर ‘अर्बन टॅक्सी’ म्हणून करण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post