काळ्या-पिवळ्या जीपची मोटारसायकलला धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर
सोलापूर रोडने दहीगावकडे जाणार्‍या मोटारसायकलला पाठीमागून वेगात आलेल्या काळ्या पिवळ्या जीपने धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलस्वार हरिभाऊ विनायक वाघ (वय 30, रा.चाहुल वस्ती, दहिगाव शिवार, ता.नगर) जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.12) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

हरिभाऊ वाघ हे मोटारसायकलवरुन शेतातून घराकडे जात असता पाठीमागून वेगात आलेल्या काळ्या पिवळ्या जीप (क्र.एम.एच.16, बी.9609) ने धडक दिली. या धडकेत हरिभाऊ वाघ गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी बाबासाहेब चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 304 (अ) 279, 337, 335, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post