२१ दिवसांमध्ये बलात्कार्यांना शिक्षा देण्यासाठी कायदा करणार : एकनाथ शिंदे


वेब टीम : नागपूर
आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात फाशी देण्याचा कायदा करणार असल्याचा निर्धार गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

बलात्काऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी तरतूद असावी अशी मागणी होत असताना जनभावनेचा विचार करून बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करणार असल्याचे गृहमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने ‘एपी दिशा अधिनियम’ नावाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार, बलात्कार प्रकरणातील दोषींना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

आरोपीच्या दोषींना २१ दिवसांत फाशीची शिक्षा व्हावी, अशी तरतूद करणारा कायदा करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post