हार्ट अटॅक येण्याची भीती वाटतेय; मग हे ऊपाय नक्की करा


वेब टीम : मुंबई
सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणे आणि त्यांचे वेळेवर निदान न होणे हे हार्ट अॅटॅकचे एक प्रमुख कारण आहे.

हे ब्लॉकेज टाळण्यासाठी आहारातील काही पदार्थ मदत करीत असतात. त्यामध्ये कलिंगड, हळद लिंबुपाणी वेलची आदींचा समावेश आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कलिंगडमध्ये मुबलक अमिनो अॅसिड असते. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती होते. या ऑक्साईडमुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. दाह कमी करणे, रक्तदाब नियंतणात ठेवणे यासाठी ते उपयुक्त ठरते.

हळदीमध्ये ‘व्हिटॅमिन बी 6’ मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाला बळकटी मिळते. हार्ट ब्लॉकेज कमी होण्यास मदत मिळते. लिंबू पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंटस मुबलक प्रमाणात असतात.

यामुळे शरीरात बॅड कॉलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. नियमितपणे वेलदोड्यांचे सेवनही हितावह ठरते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post