खुशखबर : 'या' शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ


वेब टीम : अहमदनगर
माहे जुलै व ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत बाधीत झालेल्या व शेतकर्‍यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेतला आहे.

शेतकर्‍यांकडील बाधीत झालेल्या पीकांचा पंचनामा जिल्हा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आले असून शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे तयार करण्यात आल्या.

बाधीत शेतकर्‍यांच्या याद्या तहसीलदार संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासा, कर्जत व श्रीगोंदा यांच्या् कार्यालयाकडून तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधीत तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त करुन घेण्यात आल्या

या याद्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयास पीक कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post