ज्यांना स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही; त्यांच्यामुळे पक्षाला काही धोका नाही : काकडे


वेब टीम : मुंबई
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज शुक्रवारी टीकास्त्र सोडले. पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथगडावर गुरुवारी मेळावा घेतला.

पक्ष माझ्या बापाचा असून, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. पक्षाला मला सोडायचे असेल, तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना संजय काकडेंनी आज त्यांच्यावर जोरदार टीका केली.

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामुळे पक्षाला कोणताही धोका होणार नाही. स्वत:चा मूठभर मतदारसंघ ज्यांना सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे पक्षाला काय धोका होणार? असा सवाल वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काकडे यांनी केला. मागील पाच वर्षांत पंकजा मुंडे यांनी पक्षात काही काम केले नाही, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post