निर्भया अत्याचार प्रकरण : आरोपींची फाशीची शिक्षा कायम


वेब टीम : दिल्ली
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. शिक्षेविरोधात त्यानं दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

या प्रकरणात दोषीच्या वकिलाला पूर्ण संधी दिली गेली. मात्र, त्यांनी कोणतीही नवीन बाब सांगितली नाही. दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने आधीच फेटाळल्या आहेत.

निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयकुमार सिंह याची फेरविचार याचिका न्यायमूर्ती भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. ’हा युक्तिवाद आम्ही याआधीच ऐकून घेतला आहे,’ असं कोर्टानं नमूद केलं.

अक्षयकुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post