असे आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण


वेब टीम : अहमदनगर 
जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. 

पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरता आरक्षण निश्चित करावयाचे होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी यासंदर्भातील कार्यवाही विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, तहसीलदार (सामान्य प्रशासन) वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

एकूण 14 पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध प्रवर्गासाठीचे आरक्षण खालीलप्रमाणे - अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जाती महिला - कोपरगाव, अनुसूचित जमाती - जामखेड, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) - अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) - राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण - पारनेर, नेवासा, शेवगाव, आणि सर्वसाधारण महिला - संगमनेर, राहाता, नगर, कर्जत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post