मी विधिमंडळात नाही याचे अनेकांना दु:ख वाटते : पंकजा मुंडे


वेब टीम : मुंबई
आज रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आता मी भाजपाची सामान्य कार्यकर्ता आहे, असे वक्तव्य केले.

मुंडे म्हणाल्या की, मी आता लोकप्रतिनिधी नाही. मी विधिमंडळात नाही याचे अनेकांना दु:ख वाटते आहे. हीच माझी कमाई आहे. माझा कोणावरही रोष नाही.

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मी काम करणार आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, हे येथे उल्लेखनीय.

गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर जाहीर प्रतिक्रिया दिली. मात्र, मी भाजपामध्येच राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post