विखे जातील तिथे खोड्या करतात; माजी मंत्री राम शिंदेंचा हल्लाबोल


वेब टीम : नाशिक
नगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील विविध विभागांत भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्याचं काम सध्या सुरू आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आ. आशिष शेलार यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. त्या

नुसार, शनिवारी (दि.14) त्यांनी नाशिक येथे बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली व पराभवाची कारणं जाणून घेतली. या बैठकीला प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना या तिघांनीही विखेंकडं बोट दाखवलं.

राम शिंदे म्हणाले, ’नगरमध्ये भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली.

नगर जिल्ह्यातील जागा 12-0 ने जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post