सत्ता गेल्याने भाजप सैरभैर, भाषणबाजीतच घालवला वेळ : रोहित पवार


वेब टीम : नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत पहिले भाषण केले. ते म्हणाले, विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावे अशी अपेक्षा होती.

पण सत्ता गेल्यामुळे भाजप सैरभैर झाली आहे. राजकीय भाषणबाजीतच भाजपने आपला वेळ घालवल्याची घणाघाती टीका केली.

बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती, महिला, तरुणांचे प्रश्न, सरकारी नोकरीतील रिक्त पदे आदी प्रश्नांना हात घालून रोहित पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सत्तेतील आमचा भागीदार मित्र शिवसेनेला पुन्हा ओढण्याचा भाजपचा डाव असल्याचे अजूनही त्यांच्या बोलण्यातून जाणवते; पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना राजकीय पतंगबाजी टाळली पाहिजे, असेही मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.

बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविणे गरजचे आहे. गेल्या पाच वर्षांत तीन-चार  हजार कोटी खर्च करून सुरू केलेले २२०० स्किल डेव्हलपमेंट सेंटर बंद पडले आहेत. राज्याचा विकासदर घसरला आहे.

पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य गेल्या पाच वर्षांत  १३ व्या क्रमांकावर गेले ही आपल्यासाठी निश्चितच भूषणावह गोष्ट नाही, असेही त्यांनी भाजपला  सुनावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post