भीमा-कोरेगाव प्रकरणात मला गोवण्याचा मागे बारामतीची 'मती' : भिडे गुरुजी


वेब टीम : सांगली
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसताना मला यात गोवण्यामागे बारामतीची ‘मती’ आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला.

आयोगाकडून चौकशीत हे लवकरच स्पष्ट होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीशी आपला काहीही संंबंध नाही. मी त्यावेळी राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींच्या निधन झाले होते.

तेथे रक्षाविसर्जनासाठी गेलो होतो. तरीही राजकीय रंग देण्यासाठी मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. त्यामागे बारामतीची ‘मती’ आहे.

त्यासंदर्भात चौकशीसाठी शासनाने आयोग नेमला, माझी चौकशीही झाली. पण त्यात कुठेही तथ्य आढळून आले नाही. त्याचा निकाल समोर आलेला नाही. शासनाकडून किंवा पोलिसांकडून आपल्याला कोणतीही पुणे जिल्हा बंदीची नोटीस आलेली नाही. आपण तेथे जाण्याचा प्रश्नच नाही.

भिडे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करीत आहेत. ते विकासात्मक कामांद्वारे राज्याला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवतील.

ते शरद पवार यांचा हात धरून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले याबद्दल विचारता म्हणाले, पाण्यातून पैलतीरावर जाण्यासाठी साहजिकच बुडण्यापेक्षा नावेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळेच त्यांनी राज्याला सुशासन देण्यासाठीच आघाडीला सोबत घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post