जेव्हा सर्व काही संपले असे वाटत होते, त्यावेळी साहेबांनी पुनर्जन्म दिला : भुजबळ


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशंवतराव चव्हाण सेंटर येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

पवार नेहमीच सहकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली. भुजबळ, आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही, असे ते मला म्हणाले होते. जेव्हा सर्व काही संपले असे वाटत होते, त्यावेळी साहेबांनी पुनर्जन्म दिला,अशी भावूक प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली.

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत असल्याने वाढदिवस साजरा करायचा नाही अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. मात्र हा वाढदिवस शेतकऱ्यांना समर्पित करून बळीराजाला मदत करायची अशी भूमिका मांडल्यावर त्यांनी होकार दिला.

८० लाख रुपयांचा निधी बळीराजासाठी कृतज्ञता निधी म्हणून देणार आहोत. यातील रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावे ‘फिक्स डीपॉझिट’ केली जाईल. त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत,अशी भूमिका यामागे आहे,असे जयंत पाटील यांनी सांगितले

”पवार हे ८०व्या वर्षात पर्दापण करत आहेत.या वयातही साहेबांची जिद्द,ऊर्जा थक्क करणारी आहे.त्यांचे मन तरूण आहे.आपण साहेबांचा ९०वा वाढदिवस साजरा करू, तेव्हाही ते असेच तरूण, टवटवीत वाटतील याची मला खात्री आहे.

काही वर्षांपूर्वी पवार यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. मात्र ऑपरेशन होऊनही ते निवडणुकीच्या प्रचारात उतरले. संसदेचे अधिवेशन असतानाही ते भाषण करायचे, भूमिका मांडायचे. तोंडातून कधीतरी रक्तस्राव व्हायचा, तरी ते कधीच डगमगले नाहीत,”असे पटेल म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post