इंटरनेटचा स्पीड वाढणार; एकाच वेळी पाठविणार 'इतके' उपग्रह


वेब टीम : न्यूयॉर्क
जगाला वेगवान इंटरनेट सुविधा देण्यासाठी आता वेगाने काम सुरु आहे. याच दिशेने एक पाऊल टाकत ‘स्पेस एक्स’ कंपनीने अंतराळात सॅटेलाईटस् म्हणजेच कृत्रिम उपग्रह पाठवण्याची योजना सुरु केलेली आहे.

या सॅटेलाईट्च्या माध्यमातून वेगवान इंटरनेटची सुविधा मिळू शकेल. त्यासाठी आता एकाच वेळी 60 सॅटेलाईटस् पाठवण्यात आले आहेत.

या उपग्रहांचे वैशिष्ट म्हणजे त्यांची निर्मिती ‘स्पेस एक्स’ ने आपल्या जुन्या रॉकेटच्या भागांपासून केली असून अशा पद्धतीने त्यांच्यावर होणारा अधिक खर्च वाचवला आहे. अशा पद्धतीने 24 वेळा वेगवेगळे उपग्रह अंतराळात पाठवले जातील.

‘फाल्कन’ या रॉकेटच्या सहाय्याने हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. फाल्कनचा हा चौथा अंतराळ प्रवास आहे. कॉम्पॅक्ट फ्लॅट पॅनेलच्या या छोट्या-छोट्या उपग्रहांचे वजन केवळ 260 ग्रॅम आह. यापूर्वी मे मध्येही 60 उपग्रह पाठवण्यात आले होते. आता पाठवण्यात आलेले नवे उपग्रह त्यांना जोडले जाऊन काम करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post