वेब टीम : अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग 6 मधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वर्षा रोहन सानप यांचा उमेदवारी...
वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या प्रभाग 6 मधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वर्षा रोहन सानप यांचा उमेदवारी अर्ज छानणीत बाद ठरविण्यात आला आहे.
त्यामुळे पल्लवी दत्तात्रय जाधव या भाजपाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांची शिवसेनेच्या अनिता लक्ष्मण दळवी यांच्याशी लढत रंगणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (दि.21) शेवटचा दिवस होता. या दिवसाअखेर शिवसेनेकडून अनिता दळवी तर भाजपाकडून वर्षा सानप व पल्लवी जाधव या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले होते.
दाखल अर्जांची छानणी बुधवारी (दि.22) निवडणूक निर्णय अधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार घोरपडे व तहसीलदार शितोळे, महापालिकेचे प्रभारी नगरसचिव एस.बी.तडवी, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते.
भाजपाच्यावतीने अर्ज दाखल केलेल्या वर्षा सानप यांचे नाव नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नव्हते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याचे निवडणूक अधिकार्यांकडून सांगण्यात आले. या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑक्टोबर 2019 या दिवशी अस्तित्वात असलेली मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे.
सानप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मतदारयादीत नावनोंदणी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. भाजपाने सानप यांच्याबरोबरच पल्लवी जाधव यांनाही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिलेला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरल्याने शिवनेनेच्या अनिता दळवी यांच्यासमवेत त्यांची लढत रंगणार आहे.
COMMENTS