वेब टीम : दिल्ली जागतिक कर्करोग संघटना म्हणजे ‘युआयसीसी’ ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी, जगभरात १६० देशांमध्ये १००० सदस्य ...
वेब टीम : दिल्ली
जागतिक कर्करोग संघटना म्हणजे ‘युआयसीसी’ ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी, जगभरात १६० देशांमध्ये १००० सदस्य असलेली संस्था आहे.
यांच्यामध्ये जगातील प्रमुख कर्करोग संस्था, आरोग्य मंत्रालये, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्णाचे समूह सदस्य आहेत.
ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे.
युआयसीसी आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत.
युआयसीसी हा एनसीडी युतीचा संस्थापक सदस्य देखील आहे. एनसीडी युती हे १७०मधील जवळजवळ २,००० संस्थांचे एक जागतिक नागरी समुदाय जाळे आहे.
COMMENTS