वेब टीम : अहमदनगर रस्ता ओलांडत असताना बाजुने आलेल्या मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने 70 वर्षीय वृध्दा ठार झाल्याची घटना घडली. ही घटन...
वेब टीम : अहमदनगर
रस्ता ओलांडत असताना बाजुने आलेल्या मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने 70 वर्षीय वृध्दा ठार झाल्याची घटना घडली.
ही घटना 29 जानेवारीला रात्री 8.30 च्या सुमारास पत्रकार चौक ते डिएसपी चौकाकडे जाणार्या रस्त्यावर तारकपुर झुलेलाल मंदिराजवळ घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मृणालिनी हेन्नी गायकवाड (वय 70, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपुर) या रस्ता ओलांडत असताना डीएसपीचौकाकडुन पत्रकार चौकाकडे जाणार्या मोटारसायकल (क्र. एम एच 16 सी के 5599) ने त्यांना जोराची धडक दिली.
यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेण्यात आले होते. मात्र त्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी अजय उर्फ अनातोलीक हेन्नी गायकवाड (वय- 51, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपुर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 304 अ, 279, 337, 338 प्रमाणे अपघताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गिरीश केदार हे करीत आहेत.
COMMENTS