अहमदनगर एमआयडीसीत परप्रांतीय कामगारास चोपले


वेब टीम : अहमदनगर 
शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली असता राग येऊन तिघांनी 40 वर्षीय परप्रांतीय कामगारास दगडाने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली.

ही घटना एमआयडीसी येथील सुरज दाळ मील येथे रविवारी (दि.9) सायंकाळी 4.20 वा. घडली.

याबाबतची माहिती अशी की, सुधीरकुमार ईश्‍वर पासवाल (वय 40, रा. बिहार, हल्ली रा. सुरज दाळ मील, एमआयडीसी, नगर) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी छोटेलाल माझी, सुरज माझी, भागीरथ माझी (सर्व रा. पकरी, नावंदा, बिहार, हल्ली रा. सुरज दाळ मील) यांच्या विरूध्द भारतीय दंड विधान कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

अधिक तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post