वेब टीम : अहमदनगर नगर शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन मुख्य जलवाहिनी रविवारी (दि.9) सायंकाळी नांदगावजवळ फुटली आहे. त्यामुळे शहरातील अने...
वेब टीम : अहमदनगर
नगर शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन मुख्य जलवाहिनी रविवारी (दि.9) सायंकाळी नांदगावजवळ फुटली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
शहरास पाणी पुरवठा करणारी नवीन मुख्य 1100 एम.एम.व्यासाची जलवाहिनी नांदगाव शिवारात सोनवणे वस्ती जवळ पाण्याच्या व हवेच्या दाबाने मोठया प्रमाणात लिकेज झालेले आहे. त्यासाठी सदरहू जलवाहिनीव्दारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करून जलवाहिनी दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेवून युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते. दुरुस्तीचे हे काम सोमवारी (दि.10) दुपारी 3 च्या सुमारास पूर्ण झाले असून मुळा नगर येथून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. मात्र जलवाहिनी भरुन विळद येथील पंपींग स्टेशनमध्ये पाणी पोहोचण्यास सायंकाळ नंतर सुरुवात होणार आहे.
या दुरुस्तीच्या कामाची आ. संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, दगडू पवार, बाळासाहेब पवार, जॉय लोखंडे, अभियंता परिमल निकम, महादेव काकडे आदींनी सोमवारी दुपारी पाहणी केली.
पाणी उपसा बंद राहिल्याने सोमवारी (दि.10) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदी बाजार, कापड बाजार, तोफखाना, सर्जेपुरा, माळीवाडा या भागाचा तसेच सावेडी, बालिकाश्रम रोड, कल्याण रोड परिसर, स्टेशन रोड परिसर, आगरकर मळा परिसर, विनायक नगर परिसर इत्यादी उपनगर भागाचा पाणी पुरवठा झालेला नाही. या भागातील पाणी पुरवठा हा सोमवार ऐवजी मंगळवारी (दि.11) करण्यात येईल.
तसेच मंगळवारी (दि.11) रोटेशन नुसार पाणी वाटपाचे शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी इत्यादी सह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागास पाणी परवठा होणार नसून तो बुधवारी (दि.12) नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
COMMENTS