'या' कारणामुळेच आमचा दिल्लीत पराभव : अमित शहांची कबुली


वेब टीम : दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान भाजप नेत्यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे होते. “गोली मारो सालोंको” आणि “भारत-पाक सामना” यासारखे वक्तव्य या नेत्यांनी करायला नको होते. याचाच परिणाम दिल्लीत भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले आहे.

शहा म्हणाले, भाजप केवळ विजय किंवा पराभवासाठी निवडणूक लढवत नाही तर आपल्या विचारांच्या प्रसारासाठी निवडणूक लढवत असते. गोली मारो सालोंको आणि भारत-पाक सामना यासारखे वक्तव्य आमच्या नेत्यांनी करायला नको होते.

त्यांनी यापासून आपल्याला दूर ठेवायचे होते, असेही गृहमंत्री म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. निवडणुकीच्या काळात पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम निवडणुकीवर झाल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post